शिवगंगा न्यूज
खेडशिवापुर
जिल्हा प्रशिक्षण संस्था पुणे ॲमेझॉन फ्युचर इंजिनीयर लीडरशिप फॉर इक्विटी (LFE) आणि कोड टू एनहान्स लर्निंग (CEL)संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कॉम्प्युटर सायन्स (आयसीटीसी) अंतर्गत 26 डिसेंबर, 2024 रोजी जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या होत्या . या स्पर्धेत वेळू (ता. भोर) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने नववा क्रमांक पटकावला.
पुणे येथे जिल्हास्तरीय हेकॅथॉन उत्सव स्पर्धा आयोजित केली होती.यात पुणे जिल्ह्यातील 4468 विद्यार्थ्यानी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
उत्कृष्ट अनप्लगड कृती करणाऱ्या 30 विद्यार्थी व 10 शिक्षकांची जिल्हास्तरावरील या स्पर्धेसाठी निवड झाली. यात वेळू शाळेच्या उपशिक्षिका व मार्गदर्शिका कु. अश्विनी गोविंद गुरव आणि सचित अतिश भोंडवे, वेदांती सागर ओझा, काव्या विनोद जाधव या विद्यार्थ्यांची निवड झाली
या स्पर्धेत विद्यार्थ्यानी उपस्थित सहभागी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्रश्न उत्तरे विचारून सर्व्हे करून निवडलेल्या विषयावर स्क्रॅच च्या माध्यमातून कोडींग द्वारे अनिमेशनचे सादरीकरण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी CEL चे CEO इरफान सर, LEF चे सिनियर मॅनेजर तुषार झा सर, डाएट चे प्राचार्य मा. महेश शेंडकर यांच्या उपस्थित होते . उपस्थित मान्यवरांच्या समोर विद्यार्थ्यांनी “स्कूल चले हम, साथ पढे हम” यातून देशात वाढत असलेली बालक निरक्षरता आणि त्यावरील उपाययोजना ऍनिमेशन द्वारे सदर केले. विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच सी एस हॅकॅथॉन स्पर्धेचा अनुभव मिळाला .या स्पर्धेत शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक आणि शाळेसाठी 2 टॅब , 2 टॅब कव्हर,अलेक्सा स्पीकर, 500 रू. रक्कम इत्यादी साहित्य बक्षीस स्वरूपात मिळाले आहे.
शाळेच्या मुख्याध्यापक श्रीम. वैशाली राहुल सूर्यवंशी, सौ. रुपाली मुजुमले , संगीता घोडे , निकम मॅडम, वाघमारे मॅडम, सोमनाथ मेलशेट्टी सर, सणस मॅडम, पठाण मॅडम, थोरात मॅडम यांचे सहकार्य मिळाले.
वेळू चे सरपंच मा. सुरेश सोपान पांगरे आणि ग्रामस्थांनी , शालेय व्यवस्थापन समिती यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले